जाम बसस्थानक झाले पावसाने जाम

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
समुद्रपूर,
jam bus stand तालुक्यातील जाम येथील बसस्थानकाचे बांधकाम दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. रात्री झालेल्या पावसाचे पाणी बसस्थानक परिसरात साचले. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
 

jam bus stand waterlogging due to heavy rain passengers face inconvenience in samudrapur wardha 
सध्या बसची प्रतीक्षा करण्यासाठी पुरेशी अशी व्यवस्था येथे नाही. पावसापासून संरक्षण करणारे शेड छोटे आहे. पण, ते अपुरे आहे. तसेच स्वच्छतागृहाच्या सुविधेचा अभाव आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातून येणार्या प्रवाशांचे हाल होत आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत खड्ड्यात पाणी साचून चिखल तुडवावा लागत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. बसस्थानकाच्या परिसरात jam bus stand बांधकाम साहित्य विखुरले असल्याने प्रवाशांच्या सुरक्षितेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.