मुंबई
kalyan missing girls कल्याण येथील बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नामांकित उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनी एकाच वेळी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. मुलींच्या सुरक्षित परतीसाठी सर्व स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे, तर त्या चौघी कुठे गेल्या, काय करत होत्या आणि त्या कोणाच्या संपर्कात होत्या का, याचा कसून तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ही घटना २९ जून रोजी सकाळी घडल्याचे समोर आले आहे. संबंधित शाळेतील चारही मुली नेहमीप्रमाणे घरातून शाळेत जाण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. मात्र संध्याकाळपर्यंत त्या घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंतही मुलींचा काहीही संपर्क न झाल्याने अखेर कुटुंबीयांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली.
तपासाचा भागkalyan missing girls म्हणून शाळेचा परिसर, रेल्वे स्थानक, बस स्थानक तसेच आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. यासोबतच माहितीदारांचे इनपुट, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे राज्यभर विविध पथके तयार करून व्यापक शोधमोहीम राबविण्यात येत आहे.दरम्यान, पोलिस या प्रकरणात अपहरणाच्या शक्यतेचाही गांभीर्याने तपास करत असून, मुली स्वतःहून कुठे गेल्या असाव्यात का किंवा कोणीतरी त्यांना फूस लावून नेले असावे का, यासह सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. एकाच शाळेतील चार अल्पवयीन मुली एकाच वेळी बेपत्ता झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच Thane district पोलीस यंत्रणा आणि कल्याण पोलिस आयुक्तालय या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास करत असून, मुलींचा शोध घेण्यासाठी राज्यातील विविध भागांत पथके कार्यरत करण्यात आली आहेत.