नागपूर,
Lions Club Nagpur राष्ट्रीय चिकित्सक दिवस (डॉक्टर्स डे), सनदी लेखापाल दिवस (सीए डे) आणि कृषी दिन (फार्मर्स डे) निमित्त लाॅयन्स क्लब नागपूर सेवन स्टारतर्फे समाजातील ज्येष्ठ व सेवाभावी व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ होमिओपॅथी चिकित्सक पद्मश्री डॉ. विलास डांगरे, ज्येष्ठ स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. यामिनी आळशी, सनदी लेखापाल सीए अजित दामले तसेच प्रगतिशील शेतकरी नरेश राऊत यांचा शाल, सन्मानचिन्ह आणि ‘ग्रामगीता’ ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला . Lions Club Nagpur कार्यक्रमाला क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष लाॅ. डॉ. शांतीदास लुंगे, प्रशासक लाॅ. डॉ. प्रमोद रक्षमवार, सचिव लाॅ. डॉ. अजय सावरकर, कोषाध्यक्ष लाॅ. नरेंद्र मातुरकर तसेच लाॅ. अतुल जोशी, लाॅ. डॉ. अशोक पवार, लाॅ. प्रकाश दातार, लाॅ. मुकुल पंडित यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सौजन्य:डॉ. शांतीदास लुंगे,संपर्क मित्र