सायबर गुन्हेगाराकडून दोघांची २४ लाखांची फसवणूक

- शेअर मार्केटच्या नावे गमावले २० लाख

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
cyber fraud ॲक्सीस सिक्युरिटी स्टॉक ॲनालिसीसचे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत लाखांमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला २० लाख रुपये गुंतविण्यास भाग पाडून फसवणूक केली. तर एका वकिलाला मोबाईल अपडेटच्या नावावर एपीके फाईल पाठवून ४ लाखाने फसवणूक केली. अशाप्रकारे सायबर गुन्हेगारांनी नागपुरातील दोघांची तब्बल २४ लाखांनी फसवणूक केली.
 

nagpur cyber fraud rs 24 lakh cheated through fake stock investment and apk file scam 
पहिल्या घटनेत, वाडीत राहणारे हंसराज हे शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांना काही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन नफा कमवायचा होता. त्यांनी गुगलवर शेअर मार्केटबाबत सर्च केले. एका सायबर गुन्हेगाराने त्यांना संपर्क केला. त्यांनी ॲक्सीस सिक्युरिटी स्टॉक ॲनालिसीसचे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. त्यांनी हंसराज यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली. त्या लिंकमधील कंपनीचे शेअर्स विकत घेण्यास भाग पाडले. हंसराज यांनी २० लाख रुपयांचे शेअर्स विकत घेतले. १ एप्रिल ते ३० जून पर्यंत शेअर्सला चांगला भाव दिसत होता. त्यामुळे त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता पैसे निघत नव्हते. सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केल्याचे त्यांना लक्षात आले. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
 
 
दुसऱ्या घटनेत, cyber fraud न्यू येरखेडा परिसरात राहणाऱ्या एका वकिलाच्या मोबाईलवर एक एपीके फाईलचा मॅसेज प्राप्त झाला. त्यावर मोबाईल अपडेट लिहिलेले होते. त्यांनी १ मे २०२६ रोजी त्या लिंकवर क्लिक केले. त्यांचा मोबाईल हॅक झाला. काही मिनिटांतच त्यांच्या मोबाईलमधून ३ लाख ९० हजार रुपये परस्पर काढण्यात आले. त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.