सोनेगाव राऊतला जोडणारा नवा पूल खचला

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
आजनसरा,
sonegaon raut फुकटा सोनेगाव (राऊत) या मार्गांवर पहिल्याच पावसात निकृष्ट बांधकामाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. सोनेगाव (राऊत) या गावाला तालुक्याशी जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील नव्याने बांधण्यात आलेला पूल पहिल्याच पावसात वाहून गेला. त्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. त्या पुलाची निर्मिती काही महिन्यांपूर्वीच लाखो रुपये खर्च करून करण्यात आली आहे.
 

new bridge connecting sonegaon raut collapses in first rain villagers demand action against contractor 
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाल्याला पूर आला. पुराच्या एकाच तडाख्यात पुलाच्या दोन्ही बाजूंच्या भरावासह संरक्षक भिंती पूर्णपणे खचून वाहून गेल्या. सध्या पुलाच्या ठिकाणी फक्त मोठमोठे दगड आणि १५ फूट खोल खड्डा शिल्लक आहे. गावात कुणी आजारी पडलं, एखाद्या गरोदर महिलेला प्रसूती कळा आल्या तर आम्ही त्यांना दवाखान्यात कसं नेणार. रुग्णवाहिका गावात येऊच शकत नाही. एखाद्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
शाळकरी मुलांचे शैक्षणिक नुकसान, शेतमाल बाजारात न नेता येणे आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठीही वणवण करावी लागत असल्याने गावकर्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.लाखो रुपयांचा निधी खर्च करून बांधलेला पूल काही महिन्यातच कोसळतो, याला जबाबदार कोण? संबंधित ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करून शासनाची आणि जनतेची फसवणूक केली आहे. या ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकावे आणि त्याच्यावर व कामावर देखरेख करणार्या दोषी अधिकाऱ्यावरर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.गावकऱ्यासाठी तातडीने पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.