राजभाषा हिंदीचा विकास काळाची गरज : डॉ. क्षीरसागर

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Official Language Conference राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभाग, शिक्षा संस्कृति उत्थान न्यास आणि नगर राजभाषा कार्यान्वयन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजभाषा संमेलनात कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी राजभाषा हिंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सातत्याने चिंतन आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. माहिती व तंत्रज्ञान, शिक्षण, साहित्य, व्यापार आणि जागतिक संवादात हिंदीचे वाढते महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

lk 
 
 
संमेलनात नागपूरमधील चारही नराकासमधील ५५ राजभाषा अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. हिंदी विभागप्रमुख डॉ. मनोज पांडेय यांनी राजभाषा राष्ट्रीय एकात्मतेचा सेतू असल्याचे सांगितले. Official Language Conference विविध तांत्रिक आणि प्रशासकीय क्षेत्रांतील तज्ज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, ई-गव्हर्नन्स, डिजिटल माध्यमे, ई-कॉमर्स आणि ग्राहक संवादामध्ये हिंदीचा वाढता वापर व रोजगाराच्या नव्या संधींवर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लखेश्वर चंद्रवंशी यांनी, तर आभार प्रदर्शन सत्येंद्र प्रसाद सिंह यांनी केले.
सौजन्य: लखेश्वर चंद्रवंशी,संपर्क मित्र