प्रांतिक तैलिक महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद पिपरे

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
गडचिरोली,
pramod pipre महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदावर प्रमोद पिपरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासभेचे राज्य अध्यक्ष रामदास तडस यांनी पिपरे यांची नियुक्ती केली आहे.
 

pramod pipre appointed as gadchiroli district president of prantik tailik mahasabha new executive approved 
यापूर्वी चामोर्शीचे आशिष पिपरे हे जिल्हाध्यक्षपदावर काम करीत होते. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे आशिष पिपरे यांची गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदाची नियुक्त रद्द करण्यात आली असून प्रमोद पिपरे यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी प्रमोद पिपरे यांनी दिलेल्या कार्यकारीणीला सुद्धा मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर जिल्ह्यात मेळावा आयोजन करून वरिष्ठांना निमंत्रित करून कार्यकारीणीचा पदग्रहण समारंभ घ्यावा, असे निर्देश राज्य अध्यक्ष रामदास तडस यांनी दिले.