तभा वृत्तसेवा
पुसद,
pusad gahuli krishi dindi हरितक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त पुसद ते गहुली दरम्यान आयोजित करण्यात आलेली भव्य कृषीदिंडी मंगळवारी उत्साहात पार पडली. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, वसंतराव नाईक जयंती उत्सव समिती आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या जयंतीउत्सवात बहुसंख्ये वसंतप्रेमी, शेतकरी व नागरिक, विद्यार्थी सहभागी झाले होते.

वसंतराव नाईक चौकातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. माजी प्राचार्य डॉ. उत्तम रुद्रवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी पुसद नगर परिषद अध्यक्ष मोहिनी नाईक, बाबासाहेब नाईक सूतगिरणीचे उपाध्यक्ष ययाती नाईक, दीपक आसेगावकर, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष धनंजय सोनी, उपविभागीय अधिकारी आशिष बिजवाल, मुख्याधिकारी किरण सुकलवाड तसेच विविध मान्यवर, नपचे पदाधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.त्यानंतर संस्कृतीचे दर्शन घडविणारा देखावा व दिंडी नाईक चौकातून गहुली स्मृतिस्थळाकडे मार्गस्थ झाली. शेकडो नागरिकांनी दुचाकीवरून या दिंडीत सहभाग नोंदविला. मोहिनी नाईक यांनीही स्वतः दुचाकी चालवत दिंडीत सहभाग घेतला. वरुड, ज्योतीनगर, घाटोडी, बजरंगनगर व चोंढी येथे ग्रामस्थांनी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले.
गहुली येथे पोचल्यानंतर वसंतराव नाईक यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. समाधी परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. पंकज पाल यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन झाले.सोहळ्यानिमित्त आयोजित सभेत माजी मंत्री मनोहर नाईक, नप अध्यक्ष मोहिनी नाईक, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड, प्रदेशाध्यक्ष बापूराव राठोड, गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, दीपक आसेगावकर, धनंजय सोनी, राजाराम जाधव, जीवन पाटील, सदाबा मोहटे, बाळाभाऊ कामारकर, बाजार समिती सभापती शेख कौसर, नप उपाध्यक्ष अर्चना जगताप, नप सभापती राजू सोळंके, नप सभापती खडसे, सभापती अभिजित पानपट्टे, सभापती मजरखान पठाण, डॉ. श्याम जाधव, विकास नाईकसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मोहिनी नाईक, दीपक आसेगावकर, संदेश चव्हाण व डॉ. टी. सी. राठोड यांनी समयोचित मार्गदर्शन केले. संचालन प्रा. संजय चव्हाण यांनी केले. तर आभार प्रा. नरेंद्र जाधव यांनी मानले.