वर्धा
rajyamata gomata samvad yatra पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या संयुक्त वतीने राज्यव्यापी राज्यमाता गोमाता संवाद यात्रा काढण्यात आली आहे. ती यात्रा शुक्रवार ३ रोजी वर्धा शहरात दाखल होणार आहे.
अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर राहणार आहेत. उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणुन महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा राहतील. यावेळी खासदार अमर काळे, आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाने, आमदार सुमीत वानखेडे, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार अरुण लखानी, पिपरीच्या सरपंच वैशाली गौळकर, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.राज्यमाता गोमाता संवादयात्रेचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी करुणाश्रम, पिपल फॉर अॅनिमल, पिपरी मेघे येथे सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपआयुक्त जगदीश बुकतरे, संवादयात्रा संयोजक आशिष गोस्वामी व गोशाळा प्रतिनिधी वसंत पंचभाई यांनी केले आहे.