वाशीम,
rajyamata gomata samvad yatra गोमाता धर्माचं मूळ स्थान आहे म्हणून गोमातेचे संरक्षण केलेच पाहिजे, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र महाकाली संस्थान कासोळा देवचे महंत समर्थ सदगुरू श्री गजानंद माऊली यांनी राज्यमाता गोमाता संवाद यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशु संवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाद्वारा संपूर्ण राज्यात आयोजित राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे वाशीम नगरीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. शहरातील वाटाणेवाडी येथून निघालेली संवाद यात्रा स्थानिक अकोला नाका येथील जैन भवन येथे पोहोचल्यानंतर या यात्रेचे जिल्ह्यातील गोशाळांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. याप्रसंगी समर्थ सदगुरू गजानंद माऊली, राज्य गोसेवा आयोगाचे राज्याध्यक्ष शेखर मुंदडा, महंत शांतीपूरी महाराज, संत गोपाल महाराज, संत भोलानाथ महाराज, भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, पशु आयुक्त पशु संवर्धन विभाग तुषार बावणे, गोसेवा आयोग सदस्य उद्धव नेरकर, सदस्य सुनील सूर्यवंशी, माजी आमदार विजय जाधव, कार्यवाहक पुरुषोत्तम ढोबळे, विश्व हिंदु परिषद जिल्हाध्यक्ष राम देशपांडे, गोशाळा महासंघ जिल्हाध्यक्ष देविदास पाटील राऊत, भाजपा शहर अध्यक्ष मनीष मंत्री, व्यापारी मंडळाचे जुगल कोठारी, अनिता काकडे, भीमकुमार जीवनानी, गणेश खोडे आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी आयोगाचे राज्याध्यक्ष ना. शेखर मुंदडा बोलतांना म्हणाले सभा नव्हे, भाषण नव्हे तर ही संवाद यात्रा राज्यातील गोरक्षण करीता येणार्या अडीअडचणी समस्या सोडविण्यासाठी ही संवाद यात्रा काढण्यात आल्याचे सांगितले. गाय वाचली तर देश वाचेल,धर्म वाचेल म्हणूनच राज्य सरकारने गोसेवेचे व्रत हाती घेतले आहे. गोमुत्र आणि गायींचे शेण याद्वारे क्रांती करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांनी घेतला असून, गायींचे संगोपन संवर्धन करण्याचा संकल्प सर्वांनी घेतला पाहिजे असे म्हटले.
याप्रसंगी गोपाल महाराज, विजय जाधव, अनिता काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक नेरकर यांनी,संचालन प्रा.गजानन वाघ यांनी तर आभार प्रदर्शन संतोष अवताडे यांनी केले. यशस्वितेसाठी कै.दिलिप गोरे सेवा समिती गोरक्षणचे उपाध्यक्ष प्रवीण पटेल, संतोष बियाणी, उज्वल देशमुख, विशाल भंगी, प्रसाद निरखी, दिलिप सोनी, डॉ. रिखबचंद कोठारी, मनिष संचेती, ऋषभ बरडीया, राजेश मालीया, अशोक भन्साळी,वर्धमान कुकेकर, शिखरचंद बागरेचा आदींनी परिश्रम केले. कार्यक्रमात जिल्ह्यातील गोशाळांचे संस्थाचालक,गोसेवक,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.