अमरावती,
chikhaldara-route-is-one-way : चिखलदरा हे पर्यटनस्थळ असून आजूबाजूचे जिल्ह्यातील पर्यटक सुट्टीच्या दिवशी, शनिवार व रविवारला भरपूर प्रमाणात चिखलदरा येथे येतात. चिखलदरा मार्ग हा अरुंद व घाट वळणाचा असल्याने अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे परतवाडा-चिखलदार मार्गावरील वाहतूक एक-मार्गी पद्धतीने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जारी केले आहे.
२७ सप्टेंबर २०२६ पर्यंत महिन्यातील प्रत्येक शनिवार व रविवारी, त्याचप्रमाणे शासकीय, सार्वजनिक सुट्टीचे लगत पूर्व दिवशी दुपारी २ वाजता ते शासकीय, सार्वजनिक सुट्टीचे लगत नंतरचे दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत परतवाडा वरून चिखलदरा जाणारी वाहतूक ही परतवाडा वरून धामणगाव गढी मार्गे चिखलदरा एकतर्फी जाईल तसेच चिखलदरा वरून परतवाडा परत येणारी वाहतूक ही चिखलदरा वरून घटांग मार्गे परतवाडा एकतर्फी येईल. या मार्गावरील गावातील स्थानिक नागरिकांना रस्ते वाहतूक वळविण्याच्या आदेशात सुट देण्यात येत आहे, याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.