तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
krishi din हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या योगदानामुळे आज देश व महाराष्ट्र हा कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी विकास मीना यांनी काढले.
कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने तसेच सिंजेन्टा इंडियाच्या सीएसआर उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेतील वसंतराव नाईक सभागृहात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विकास मीना, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रकल्प संचालक आनंद पिंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आभाळे, कृषी विकास अधिकारी आडे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. अमरशेट्टीवार, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रदीप कच्छवे, सिंजेन्टा इंडियाचे प्रतिनिधी चिदंबरम फडणीससह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकास मीना यांनी वसंतराव krishi din नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील दूरदृष्टीपूर्ण कार्याचा गौरव करताना आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन व्यवस्थापन आणि माहितीच्या प्रभावी वापरावर भर दिला. आज माहितीचे युग आहे. ज्या शेतकèयाकडे योग्य माहिती असेल तो अधिक सक्षमपणे निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे ‘महाविस्तार’ अॅपसह विविध माध्यमातील शेतीविषयक माहितीचा वापर करून शेतकèयांनी स्वतः सक्षम व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
खत व बियाण्यांच्या वितरणावर लक्ष असून अवैध खत विक्री आणि बियाणे लिंकिंगवर कठोर कारवाई सुरू असल्याचेही जिल्हाधिकाèयांनी स्पष्ट केले. शेतकèयांना खत बियाण्यांची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.संतोष धोत्रे यांनी वसंतराव नाईक यांच्या कृषी आणि ग्रामीण विकासातील योगदानाची माहिती देत आधुनिक शेतीत दर्जेदार बियाणे व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले.मनोज ढगे यांनी वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीनुसार आज स्मार्ट शेती, कृषी विस्तार, पूरक व्यवसाय आणि शेती अर्थव्यवस्थेच्या योग्य नियोजनामुळे शेती क्षेत्र उद्योग म्हणून विकसित होऊ शकते, असे सांगितले.
प्रदीप कच्छवे यांनी पीक नियोजन, पेरणी, सिंचन व्यवस्थापन, फवारणी व कीड नियंत्रणाबाबत शेतकèयांना मार्गदर्शन केले. चिदंबरम फडणीस यांनी प्रशासनासोबत कृषी विकासासाठी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.
प्रास्ताविक कृषी विकास अधिकारी आडे यांनी केले. संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी केले. तर आभारप्रदर्शन प्रवीण जाधव यांनी केले.
विजेत्या शेतकèयांचा सत्कार
यावेळी पीक स्पर्धेतील विजेते, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत उल्लेखनीय कार्य करणाèया शेतकèयांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.