आला नाही आला त धोधो; १८ मंडळांत अतिवृष्टी

जिल्ह्यात ५०.४ मिमी पाऊस

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
वर्धा,
heavy rainfall जून महिना जवळपास कोरडाच गेला. त्यामुळे आता पावसाची आशा सोडलेल्या शेतकर्यांना जुलैच्या पहिल्याच दिवशी आलेल्या पावसाने सुखावले. परंतु, आलेला पाऊस अति झाल्याने नुकसानकारक ठरला. जिल्ह्यातील १८ मंडळात अतिवृष्टी झाली. बुधवारी रात्री उशीरापर्यंत जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गत २४ तासांत जिल्ह्यात ५०.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आष्टी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्याच्या आठही तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे.
 
 
wardha district heavy rainfall report july 2026 excessive rain in 18 revenue circles causes heavy rainfall damage
मागील २४ तासात आर्वी तालुक्यात ६३.६ मिमी, कारंजा ५८.३ मिमी, आष्टी ७९ मिमी, वर्धा ५३.५ मिमी, सेलू ३५.७ मीमी, देवळी ४० मिमी, हिंगणघाट ४७.१ मिमी तर समुद्रपूर तालुक्यात ४०.१ मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा घेतली. यावर्षी जून महिन्यात पावसाची तुट कायम राहिली. जून महिन्यात केवळ ७१ टक्केच पाऊस झाला. २१ जूनपासून पावसाला सुरूवात झाल्याने शेतकर्यांनीही पेरणीच्या कामाला गती दिली. जिल्ह्यात आतापर्यंत १.१३ लाख हेक्टरवर खरीप पिकांची लागवड झाली आहे. तर मिळेल तेथून मजूर आणून शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. अल निनो आणि वातावरणातील बदलामुळे यंदा पाऊस कमी राहणार असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला. दरम्यान, बुधवारी रात्री जिल्ह्यात धो-धो झालेला पाऊस शेतकर्यांसह नागरिकांना दिलासा देणारा ठरला आहे.
बुधवारी झालेल्या heavy rainfall  मुसळधार पावसामुळे नदी व नाल्यांच्या पाणी पातळीत काही प्रमाणात का होई ना वाढ झाली आहे. बुधवारी विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी नुकसान झाले आहे. कुठल्या तालुक्यात किती नुकसान झाले याची माहिती सध्या जिल्हा प्रशासन जाणून घेत आहे.
तालुकानिहाय मंडळांत झालेली अतिवृष्टी
वायगाव : ७९ मिमी, वडनेर : ६६.८ मिमी, पोहणा : ११५.३ मिमी, अल्लीपूर : ६६.५ मिमी,
सिरसगाव : ६६.८ मिमी, वर्धा : ६६.५ मिमी, सिलोड : ७८.८ मिमी, सेवाग्राम : ६६.५ मिमी
तळेगाव : ६६.५ मिमी, सारवाडी : ८२.२ मिमी, कन्नमवारग्राम : ६५ मिमी, ठाणेगाव : ६५ मिमी, आष्टी : ९१.५ मिमी, तळेगाव : ८०.५ मिमी, साहुर : १३२.५ मिमी, आर्वी : ९९.८ मिमी, वाठोडा : ८० मिमी, दाऊतपूर : ७७ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली.
चौकट समाप्त