जिल्हा बँकेच्या 64,865 खातेधारकांची माहिती पोर्टलवर

शेतकरी कर्जमुक्ती योजनेला गती

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा

यवतमाळ, 

yavatmal district bank  नाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ च्या प्रक्रियेला गती आली असून, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत एकूण 64 हजार 865 खातेधारकांची माहिती योजनेच्या अधिकृत पोर्टलवर यशस्वीरीत्या अपलोड करण्यात आली आहे.
 
yikyuj
 
सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, जिल्हा बँकेकडून माहिती अपलोडची प्रक्रिया करण्यात आली असून, त्याआधारे पात्र लाभार्थ्यांची माहिती शासनाच्या प्रणालीवर उपलब्ध झाली आहे. यामुळे योजनेच्या पुढील पडताळणी व लाभ वितरण प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होणार आहे.सरकारी तसेच खाजगी बँकांकडून अपलोड करण्यात आलेल्या खातेधारकांच्या माहितीचे संकलन व सनियंत्रण हे महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. विविध बँकांकडून प्राप्त माहितीची तांत्रिक पडताळणी, एकत्रीकरण आणि आवश्यक तपासणीची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे.
 
कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकèयांना yavatmal district bank  पारदर्शक व अचूक पद्धतीने लाभ मिळावा, यासाठी सर्व बँकांकडील माहिती वेळेत आणि योग्य स्वरूपात पोर्टलवर उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार इतर बँकांकडील माहितीचे संकलन आणि पडताळणीची प्रक्रिया संबंधित प्राधिकरणामार्फत सुरू आहे.
 
शेतकèयांनी योजनेसंदर्भातील शासनाच्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा तसेच आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.