सिद्धेश्वर नगरात योग संस्कार शिबिर संपन्न

    दिनांक :02-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Yoga Sanskar Camp सिद्धेश्वर नगर, दिघोरी येथील सिद्धेश्वर गणपती मंदिरात योगश्री संस्थेतर्फे १००१ संकल्पित निशुल्क योग संस्कार शिबिर उपक्रमांतर्गत १९०वे मोफत योग संस्कार शिबिर उत्साहात पार पडले.
 

yog 
 
२५ जून ते १ जुलैदरम्यान आयोजित या शिबिरात सेवानिवृत्त योग शिक्षक नरेश चिंतामणराव भांदककर यांनी महर्षी पतंजलींचे अष्टांग योग, यम-नियम, आसन, प्राणायाम, शुद्धीक्रिया, ध्यान, योगनिद्रा, सूर्यनमस्कार तसेच आहार-विहार याविषयी मार्गदर्शन केले. परिसरातील महिला, पुरुष, युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. Yoga Sanskar Campशिबिराचे आयोजन कुसुमलता वाकडे, विकास पवार, ज्ञानेश्वर ढोबळे व सहकाऱ्यांनी केले. समारोपानंतर सहभागींसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले.
सौजन्य: सतीश देशपांडे ,संपर्क मित्र