पीकविम्यात चुकीची माहिती दिल्यास कारवाई

कृषी विभागाचा इशारा : विविध लाभापासूनही ठेवणार वंचित

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
crop-insurance : सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामापासून लागू करण्यात आली असून, या वर्षापासून डिजिटल पीक सर्वेक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. पीक विमा अर्जातील माहिती आणि डिजिटल पीक सर्वेक्षणातील नोंदींमध्ये तफावत आढळल्यास डिजिटल सर्वेक्षणातील नोंदच अंतिम मानली जाणार आहे. योजनेत पारदर्शकता वाढविणे, बोगस दावे रोखणे आणि पात्र शेतकèयांनाच लाभ मिळावा, या उद्देशाने राज्य शासनाने सुधारित नियम लागू केले आहेत. त्यामुळे शेतकèयांनी पीक पेरणीची माहिती अचूक भरून डिजिटल पीक सर्वेक्षणात योग्य नोंद करून घेण्याचे आवाहन आर्णी तालुका कृषी विभागाने केले आहे.
 
 
K
 
 
 
कृषी चुकीची माहिती देणे, बनावट कागदपत्रे सादर करणे किंवा बोगस दावा केल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित शेतकèयाला पाच वर्षांसाठी पीक विमा तसेच नमो किसान सन्मानसह कृषी विभागाच्या विविध योजनांमधून अपात्र करण्यात येणार आहे. खरीप व रबी हंगामासाठी सुधारित योजना लागू करण्यात आली आहे. खरीप पीक विमा अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. तर रब्बी पिकासाठी वेगवेगळी तारीख निश्चित करण्यात आली आहे. मुदतीपूर्वी अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
 
 
 
डिजिटल पीक सर्वेक्षणासह काही गोष्टी अनिवार्य करण्यात आल्या आहेत. डिजिटल पीक सर्वेक्षणात पिकांची नोंद करणे, आधार क्रमांक संलग्न करणे, बँक खाते व मोबाईल क्रमांक अद्ययावत असणे तसेच आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करणे गरजेचे आहे. योजनेतील इतर प्रमुख बदल असे, डिजिटल नोंदींना अधिकृत मान्यता, बोगस अर्जावर कठोर कारवाई, दावा पडताळणी अधिक पारदर्शक, तांत्रिक माध्यमातून पडताळणीला प्राधान्य देण्यात येणार आहे.
 
 
तफावत आढळल्यास सर्वेक्षणातील नोंदच अंतिम मानली जाईल. पीक विमा अर्जातील पीक आणि डिजिटल पीक सर्वेक्षणातील पीक, यामध्ये फरक आढळल्यास डिजिटल पीक सर्वेक्षणातील माहितीच अंतिम ग्राह्य धरली जाणार असल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.
चुकीची माहिती नकोच
 
 
सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकèयांनी लाभ घ्यावा, शेतात ज्या पिकांची लागवड केली, तीच शेतपिके पीक विमा योजनेत नोंदवा. खोटी माहिती भरू नका. या पीकविम्यात चुकीची माहिती भरणाèया शेतकèयाला पाच वर्षांसाठी पीक विमा तसेच नमो किसान सन्मानसह कृषी विभागाच्या विविध योजनांमधून अपात्र करण्यात येणार आहे. यामुळे शेतकèयांनी पीकविम्याची माहिती भरताना पारदर्शक भरावी.
आनंद बदखल
तालुका कृषी अधिकारी, आर्णी.