सप्टेंबरपासून सर्व सरकारी कामकाज बंगाली भाषेत

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |

 

कोलकाता
suvendu adhikari  पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी सोमवारी राज्य विधानसभेत एक मोठी घोषणा केली. पश्चिम बंगाल सरकार १ सप्टेंबरपासून आपले सर्व शासकीय कामकाज बंगाली भाषेतच करेल. तसेच राज्य सरकारच्या सर्व स्तरांवर बंगाली भाषेचा वापर अनिवार्य असेल, असे त्यांनी जाहीर केले.

adhikari 
 
 

suvendu adhikari  मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, केंद्र सरकार आणि इतर राज्यांसोबतच्या सर्व पत्रव्यवहारात बंगाली भाषेचा वापर केला जाईल. केंद्र सरकारसोबतच्या पत्रव्यवहारासाठी बंगालीसोबतच हिंदीचाही वापर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शुभेन्दू अधिकारी यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या तीन दिवसीय दौऱ्यादरम्यान त्यांना बंगाली भाषेत एक पत्र लिहिले. या पत्रात अमित शाह यांनी राज्य प्रशासनाच्या सर्व स्तरांवर बंगाली भाषेचा व्यापक वापर सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा ठाम विश्वास होता की, प्रशासन, शिक्षण आणि सार्वजनिक जीवनात भारतीय भाषांना त्यांचे योग्य स्थान दिले पाहिजे, असेही पत्रात नमूद केले.

 

भाषिक विविधता जपण्यावर भर

suvendu adhikari  एक दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री यांनी कोलकाता येथे ’शब्द संग्रहालया’चे उद्घाटन केले. उद्घाटनावेळी, त्यांनी आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त किमान एक भारतीय भाषा शिकण्याच्या गरजेवर भर दिला. देशाची सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी भाषिक विविधता टिकवून ठेवण्याचे त्यांनी समर्थन केले.