मुंबईcm fadanvis संतपरंपरेचे जतन करत आणि आध्यात्मिक वारसा जपत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अमरावती, काटोल आणि गंगाखेडच्या ११५ कोटींच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
cm fadanvis सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विविध तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची (शिखर समिती) बैठक पार पडली. या बैठकीत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्र, अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसर अशा तीन महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास आराखड्यांना एकूण ११५ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली. उत्सव काळातील भाविकांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन आराखड्यातील सर्व कामे दर्जेदार पद्धतीने आणि निश्चित कालमर्यादेत टप्प्याटप्प्याने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ
cm fadanvis श्री संत गाडगे महाराज स्मृती केंद्र कल्चरल व्हॅल्यू एज्युकेशन सेंटरचे उर्वरित बांधकाम, स्मृति भवन परिसरामध्ये शेतकरी ग्राम सफाई मिशन सेंटरच्या तळमजल्याचे बांधकाम, यात्री निवासाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे बांधकाम, कीर्तनासाठी सभागृह, मुख्य समाधीचा जीर्णोद्धार व सौंदर्यीकरण, ध्यान केंद्रासाठी इमारत, कुंताबाई समाधीचे सौंदर्यीकरण, अंतर्गत रस्ते, पार्किंग आणि बगीचे उभारण्यात येतील.
भगवान श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसर, काटोल
महानुभाव पंथाच्या या ऐतिहासिक तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यात बहुउद्देशीय सभागृह, आधुनिक सार्वजनिक प्रसाधनगृह, भव्य प्रवेशद्वार, संरक्षक भिंत, वाहनतळ, बगीचा, कमानी पूल, पाथवे आणि इतर महत्त्वाच्या पर्यटन सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. यामुळे भाविकांसाठी सुरक्षित, सुसज्ज आणि आधुनिक सुविधा निर्माण होतील.