आर्वी आगारात विद्याथ्र्यांचा ठिय्या

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
आर्वी, 
students-sit-in-protest : येथील आगारात बाळा जगताप यांच्या नेतृत्वात विद्याथ्र्यांनी विविध मागण्यांसाठी आज २० रोजी ठिय्या आंदोलन केले. तालुक्यातील हराशी, पाचोड, बेलोरा तांडा, हिवरा व वाढोणा येथील विद्यार्थी या ठिय्या आंदोलनात सहभागी होते.
 
 
 
j
 
 
तालुक्यातील गावातून महामंडळाची बस विद्याथ्र्याची ने-आण करते त्या बसमध्ये ७० ते ८० विद्यार्थी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करतात. त्यामुळे एवढ्या विद्यार्थांसाठी ही एक बस पुरेशी नाही. त्यामुळे या सर्व गावातून विद्याथ्र्यांसाठी विशेष बस सुरू करण्यात यावी. जेणेकरून विद्याथ्र्यांना शाळेत ये-जा करताना कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही. शाळेच्या वेळेवर दोन्ही वेळेला नवीन बस फेरी सुरू करण्यात यावी, अशी मागणी यावेळी विद्याथ्र्यांनी केली. आंदोलनकत्र्यांच्या मागण्या जाणून घेतल्यानंतर आगार व्यवस्थापकांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. सोबतच नवीन बस फेरी सुरू करू, अशी हमी दिल्याने विद्याथ्र्यांनी आंदोलन मागे घेतले.