त्या’ अल्पवयीन मुलीला न्याय द्या

बजरंग दल सेलू प्रखंडाची निष्पक्ष चौकशीची मागणी

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
सेलू,

selu रोठा येथे १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचार व खून प्रकरणाचा बजरंग दल, सेलू प्रखंडाने तीव्र निषेध नोंदवत पीडितेला न्याय मिळावा, अशी भूमिका घेतली आहे. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.बजरंग दलाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात, कोणत्याही मुलीवर होणारी हिंसा ही संपूर्ण समाजासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींना शक्य तितक्या लवकर कठोरात कठोर तसेच फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
 
bajrang dal seeks justice for minor girl in selu, demands fair probe and strict action
याशिवाय भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मुलींच्या सुरक्षेसाठी प्रभावी व ठोस उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. समाजातील प्रत्येक नागरिकाने अन्यायाविरोधात एकजुटीने आवाज उठवून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही बजरंग दलाने केले आहे.
या संदर्भात बजरंग दल सेलू प्रखंडचे तालुका (संयोजक) अध्यक्ष सनी राय यांनी पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.