चिरंजीव गड्डमवार यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार

(‘गोष्ट सुरू होते’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला)

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
अहेरी, 
best-actor-award : अविरल फिल्म्स आयोजित प्रतिष्ठित कलावंत सन्मान सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील उगवते कलाकार चिरंजीव किश्टय्या गड्डमवार यांना ‘मी हनुमंत रिक्षावाला’ या चित्रपटातील दमदार आणि प्रभावी अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने गौरविण्यात आले. सोबतच, चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल कुंतल खोजरे यांचाही सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
 

jn 
 
या दिमाखदार सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर, तंत्रज्ज्ञ, कलाकार आणि रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘मी हनुमंत रिक्षावाला’ या चित्रपटाचे निर्माते विनोद जैस्वाल तर दिग्दर्शक हमीद पटेल आहेत. चित्रपटातील चिरंजीव गड्डमवार यांच्या रिक्षाचालकाच्या भूमिकेने प्रेक्षकांसह समीक्षकांचीही मने जिंकली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावुक होत चिरंजीव गड्डमवार यांनी हा सन्मान चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, सहकलाकार, तंत्रज्ञ, त्यांचे कुटुंबीय आणि प्रेक्षकांना समर्पित केला.
 
‘गोष्ट सुरू होते’ रिलीजच्या अंतिम टप्प्यात
 
 
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान मिळाल्यानंतर चिरंजीव गड्डमवार यांच्या आगामी प्रोजेक्टचीही जोरदार चर्चा रंगली आहे. ‘अस्तित्व स्टुडिओ फिल्म प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘गोष्ट सुरू होते’ या नव्या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. या नव्या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, ‘मी हनुमंत रिक्षावाला’ च्या यशानंतर या आगामी सिनेमाकडूनही प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.