युक्रेनमध्ये मालवाहू जहाजावर भीषण हल्ला; ४ भारतीय खलाशांचा मृत्यू

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
ओडेसा बंदर (युक्रेन),
cargo-ship-attacked : युक्रेनमधील ओडेसा बंदरावर उभ्या असलेल्या एका मोठ्या मालवाहू जहाजावर भीषण हल्ला झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. या भीषण हल्ल्यामध्ये जहाजावर कार्यरत असलेले चार भारतीय खलाशी (कर्मचारी) जागीच ठार झाले आहेत. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
 
 
 
cargo-ship-attacked
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, 'एम. व्ही. गोल्डन लिओ' नावाच्या मालवाहू जहाजाला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. हे जहाज ओडेसा बंदराच्या परिसरात उभे असताना अचानक यावर हल्ला झाला. हल्ल्याचे स्वरूप आणि तीव्रता इतकी भीषण होती की, जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्यांना स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.
 
या दुर्दैवी घटनेनंतर भारतीय दूतावास आणि संबंधित यंत्रणांनी तात्काळ पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मृत पावलेल्या भारतीय खलाशांचे मृतदेह सुरक्षितपणे ताब्यात घेणे आणि ते सन्मानाने भारतात त्यांच्या कुटुंबियांकडे पोहोचवणे यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच, जहाजावरील इतर सुरक्षित कर्मचाऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे.
 
युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे हा सागरी परिसर आधीच संवेदनशील बनला आहे. मात्र, व्यापारी जहाजांवर झालेल्या या ताज्या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात असून, निष्पाप भारतीय खलाशांच्या मृत्यूमुळे देशात हळहळ व्यक्त होत आहे.