दिव्यांग मुलांची चित्रकला स्पर्धा साजरी

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Chief Minister Devendra Fadnavis's Birthday भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी, नागपूर महानगरतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत ६० दिव्यांग मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला.
 
 
cui
 
 
कार्यक्रम जयसिंग चव्हाण, धनंजय उपासणी व सुनील मित्रा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहराध्यक्ष शेषराव (बालू) मांडवकर यांच्या नेतृत्वात पार पडला. यावेळी उपेंद्र कोठेकर, दयाशंकर तिवारी, परीक्षक कपले सर, रितेश गावंडे, निधी तेलगोटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.स्पर्धेत सहभागी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले.
सौजन्य:वैभव जोशी,संपर्क मित्र