६८ रुग्णांना आधार ठरली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी याेजना

५८ लाख ३० हजाराची आतापर्यंत मदत!

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
भंडारा,
cm-medical-assistance-fund-scheme : जारपणात मानसिक आधारासोबतच आर्थिक आधारही तेवढाच महत्त्वाचा असताे. अनेकदा पैशांअभावी शस्त्रक्रिया हाेऊ शकत नाही आणि आराेग्याच्या अडचणी अधिक क्लीष्ट हाेतात. मात्र, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आज अशा अनेक गरजू रुग्णांसाठी आधार ठरत आहे. भंडारा जिल्ह्यात १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत ६८ रुग्णांना ५८ लाख ३० हजारांची मदत करण्यात आली.
 
 

jk 
 
 
 
शासनाच्या अनेक याेजना असतात, मात्र त्या लाेकांपर्यंत पाेहोचत नसल्याने त्यांचा लाभ गरजूंना मिळत नाही. मात्र, मुख्ममंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अडचणीत असलेल्या रुग्णांना मदत ठरत आहे. वेगवेगळ्या २० आजारांवरील शस्त्रक्रियेसाठी या याेजनेतून मदत दिली जाते. रुग्ण रुणालयात दाखल हाेत, मदत कक्षाकडे प्रस्ताव पाठविल्यापासून ४ दिवसांच्या आत ही मदत थेट रुग्णालयाकडे वळती हाेत असल्याने या याेजनेचा फायदा ताबडताेब मिळत असल्याची प्रतिक्रिया अनेक रुग्णांनी दिली. हृदय प्रत्याराेपणापासून जळीत रुग्णांवर हाेणाऱ्या शस्त्रक्रिया यांचा यात समावेश आहे.
 
 
भंडारा जिल्ह्यात १ एप्रिल २०२५ ते ३० जून २०२६ या कालावधीत ६८ रुग्णांनी या याेजनेचा लाभ घेतला. त्यांना ५८ लाख ३० हजार रुपयांची मदत करण्यात आली. शासनाच्या या उपक्रमांतर्गत चार दिवसांत किंवा त्यापेक्षाही कमी कालावधीत निधी उपलब्ध हाेत असल्याने या याेजनेकडे रुग्णांना आजारापणात माेठा दिलासा म्हणून पाहिले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून, या याेजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा समन्वयक नचीकेत बांडेबुचे यांनी केले आहे.