काहीतरी खूप मोठं घडणार!

सर्वात घातक ‘कोब्रा कमांडोज’ संवेदनशील भागात दाखल

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
इम्फाळ,
cobra commandos मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अधिक मजबूत करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाने मोठ्या विशेष मोहिमेची तयारी सुरू केली आहे. या मोहिमेसाठी सीआरपीएफच्या विशेष प्रशिक्षित कोब्रा कमांडोंच्या दोन बटालियन मणिपूरमध्ये पाठवण्यात आल्या असून त्यांना विशेष प्रशिक्षण दिल्यानंतर संवेदनशील भागात तैनात केले जाणार आहे. या मोहिमेत प्रथमच महिला कमांडोंनाही महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे.
 
 
 
cobra commandos
 
सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मणिपूरमधील गेल्या काही महिन्यांतील हिंसाचार, बेकायदेशीर शस्त्रांचा वापर आणि सुरक्षादलांसमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांचा अभ्यास करून या मोहिमेची आखणी करण्यात आली आहे.
तीन ते चार आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण
मणिपूरमध्ये पाठवण्यात आलेल्या कोब्रा कमांडोंना थेट कारवाईत उतरवण्यापूर्वी मणिपूर आणि सिलचर येथे तीन ते चार आठवड्यांचे प्री-इंडक्शन प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणात स्थानिक परिस्थिती, संभाव्य धोके, गर्दी नियंत्रण, संवेदनशील भागातील कारवाया आणि विविध प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या कमांडो पथकांची राज्यातील विविध संवेदनशील भागात नियुक्ती केली जाणार आहे.
मोहिमेचा मुख्य उद्देश काय?
1)या विशेष मोहिमेचा प्रमुख उद्देश मणिपूरमधील बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा शोध घेऊन ती जप्त करणे हा आहे.
2)कोब्रा कमांडोंची पथके सातत्याने संवेदनशील भागात गस्त घालतील. गुप्तचर यंत्रणेकडून मिळणाèया माहितीच्या आधारे शस्त्रसाठ्यांवर छापे टाकून कारवाई केली जाईल.
3)याशिवाय परवानगीशिवाय शस्त्र बाळगणाèया किंवा शस्त्रांसह फिरणाऱ्या व्यक्तींवरही कठोर कारवाई केली जाणार आहे.
4)गेल्या काही महिन्यांत मणिपूरमधील हिंसाचारादरम्यान अनेक समाजविघातक घटक खुलेआम शस्त्रांसह फिरताना दिसल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सचीही मदत
यापूर्वीच्या कारवायांदरम्यान सुरक्षादलांवर दबाव आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक घटनास्थळी जमल्याचे अनेकदा पाहायला मिळाले होते.cobra commandos त्यामुळे अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या तुकड्यांनाही या मोहिमेत सहभागी करण्यात आले आहे, असे सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.