देशात पुन्हा नोटबंदी?

आरबीआय नव्या नोटा आणण्याच्या तयारीत

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
demonetization भारतीय रिझर्व्ह बँक देशात 10 आणि 20 रुपयांच्या पॉलीमर म्हणजेच प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्यासाठी एक विशेष पायलट प्रकल्प राबवण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित नव्या नोटा सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या पारंपरिक कागदी नोटांच्या तुलनेत कमालीच्या सुरक्षित, अधिक टिकाऊ आणि दीर्घकाळ वापरता येण्याजोग्या असतील, असा विश्वास तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. या नवीन बदलाची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये जुन्या नोटांच्या वैधतेबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या, ज्यावर आता संपूर्ण परिस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे.

देशात पुन्हा नोटबंदी? 
 
नोटा एका रात्रीत बाद होणार नाहीत
नवीन प्लास्टिक नोटा चलनात आल्या तरी सध्या बाजारात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाèया कागदी नोटा एका दिवसात किंवा अचानक बंद केल्या जाणार नाहीत, हे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सर्वसामान्य नागरिकांना आणि बँकिंग व्यवस्थेला कोणताही त्रास होऊ नये म्हणून रिझर्व्ह बँकेने खालीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने नियोजन आखले आहे.
- नवीन पॉलीमर नोटा जारी झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात दोन्ही प्रकारच्या नोटा बाजारातील दैनंदिन व्यवहारात एकत्र आणि कायदेशीर म्हणून सुरू राहतील.
- नागरिकांना आपल्या जवळील जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी किंवा त्या बँकेत जमा करण्यासाठी सरकार आणि आरबीआयकडून पुरेसा अवधी दिला जाईल.
- व्यवहारादरम्यान बँकांमध्ये जमा होणाèया जुन्या कागदी नोटा पुन्हा ग्राहकांना वाटप न करता थेट रिझर्व्ह बँकेच्या मुख्य कार्यालयाकडे सुपूर्द केल्या जातील.
- आरबीआयकडे जमा झालेल्या या जुन्या नोटा विशेष चलन प्रक्रिया यंत्रांच्या साहाय्याने सुरक्षितपणे नष्ट केल्या जातील आणि त्यांच्या जागी नव्या नोटा बाजारात आणल्या जातील.
ग्राहकांना सहज मिळणार नव्या नोटा
नव्याने डिझाईन केलेल्या या प्लास्टिक नोटा बाजारात आल्यानंतर सर्वसामान्य ग्राहकांना त्या बँकांच्या माध्यमातून अतिशय सहजतेने उपलब्ध करून दिल्या जातील. नागरिकांना त्यांच्याकडील जुने कागदी चलन नेहमीप्रमाणे आपल्या बँक खात्यात जमा करता येईल किंवा बँकेच्या काउंटरवर जाऊन त्या बदलून घेण्याचा पर्यायही खुला असेल.demonetization यासोबतच, व्यापारी बँका जसजसा आपला जुना चलनसाठा नवीन नोटांशी बदलू लागतील, तसतसे देशभरातील एटीएम मशिन्समध्ये आवश्यक ते तांत्रिक बदल करून त्यातूनही हळूहळू प्लास्टिकच्या नोटा वितरीत करण्याचे काम सुरू केले जाईल.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सध्या वापरात असलेल्या कागदी नोटा दीर्घकाळासाठी कायदेशीर चलन म्हणून पूर्णपणे वैध राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारची घाई करण्याची किंवा बाजारातील अफवांना बळी पडण्याची अजिबात गरज नाही. प्लास्टिकच्या नोटा टप्प्याटप्प्याने चलनात आणल्या जाणार असल्यामुळे चलनाचा तुटवडा निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. ही नवीन व्यवस्था देशातील बनावट नोटांच्या समस्येला आळा घालण्यासाठी आणि चलनाचे आयुष्य वाढवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.