गडचिरोली,
namdev-kirsan : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खासदार डॉ. नामदेव किरसान म्हणाले, पुस्तक हे ज्ञानाचे अमूल्य साधन आहे. अभ्यासाला कधीही कंटाळू नका. आज मिळवलेले ज्ञानच भविष्यात तुमच्या यशाचा पाया ठरणार आहे.
कार्यक्रमाला आमदार अभिजित वंजारी, आमदार रामदास मसराम, जिल्हा माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, ड. दुष्यंत किरसान, जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव कुसूम आलम, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन पा. नाट, शंकरराव सालोडकर, प्रभाकर वासेकर, समशेर खान पठाण, माधव गावड, अजय लोंढे, परसराम टिकले, नगरसेवक रमेश चौधरी, नगरसेवक पराग पोरेड्डीवार, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेविका मेघा वरगंटीवार, नगरसेविका मनिषा खेवले, नगरसेवक नंदू कायरकर, सुनील चटगुलवार, मिलिंद खोब्रागडे, नेताजी गावतुरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो विद्यार्थी उपस्थित होते. याच कार्यक्रमात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत 25 हून अधिक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.