चीनमध्ये फूड डिलिव्हरी बॉयला सर्वात मोठा साहित्यिक सन्मान

जेवण पोहोचवताना अनेक कविता लिहिल्या; 14 व्या वर्षी सुटले होते शिक्षण

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
बीजिंग,
honor in china चीनमध्ये फूड डिलिव्हरीचे काम करणाऱ्या 56 वर्षीय वांग जिबिंग यांना देशातील सर्वात प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारांपैकी एक असलेला लू शुन साहित्य पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या ’लो फ्लाइट’ या कविता संग्रहाला हा सन्मान देण्यात आला आहे. या पुस्तकातील अनेक कविता त्यांनी फूड डिलिव्हरीच्या कामादरम्यान मिळालेल्या मोकळ्या वेळेत कागदाच्या लहान-लहान तुकड्यांवर लिहिल्या होत्या.
 

honor in china 
 
 
वांग 2019 च्या सुमारास फूड डिलिव्हरी रायडर बनले होते. त्यांच्या कविता सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाल्या. त्यांचे नवीन पुस्तक ‘लो फ्लाइट’ हे डिलिव्हरी रायडर्सच्या दैनंदिन समस्या, संघर्ष आणि जीवनावर आधारित आहे. हे पुस्तक त्यांनी 2024 मध्ये प्रकाशित केले होते. यासाठी त्यांनी सुमारे 200 डिलिव्हरी रायडर्सशी संवाद साधला आणि त्यांचे अनुभव आपल्या कवितांमध्ये नोंदवले.
त्यांच्या एका कवितेची ओळ आहे, ‘पंख पसरवण्याचा अर्थ फक्त उंच उडणे आहे असे कोणी म्हटले? खाली उडणे देखील उड्डाणच आहे.‘ वांग यांचा जन्म चीनमधील जिआंगसू प्रांतात झाला होता. आर्थिक अडचणींमुळे त्यांना 14 व्या वर्षीच शिक्षण सोडावे लागले. त्यानंतर त्यांनी बांधकाम मजूर, भंगार वेचणारे आणि रस्त्याच्या कडेला वस्तू विकणारे असे अनेक छोटे-मोठे काम केले. नंतर ते फूड डिलिव्हरी रायडर बनले. मात्र, त्यांचे वाचन-लेखनाचे वेड कधीच संपले नाही.
एका कवितेमुळे मिळाली ओळख
2022 मध्ये त्यांची ‘मॅन इन अ हरी’ ही कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ही कविता 2019 मधील एका घटनेने प्रेरित होती. त्यावेळी ते जिआंगसूच्या कुनशान शहरात फूड डिलिव्हरीचे काम करत होते. एका ग्राहकाने चुकीचा पत्ता नोंदवला होता. योग्य घर शोधण्यासाठी वांग यांना तीन निवासी इमारतींमध्ये भटकावे लागले आणि 18 मजल्यांपर्यंत पायऱ्या चढाव्या लागल्या.
जेव्हा ते शेवटी जेवण घेऊन पोहोचले, तेव्हा ग्राहकाने उशीर झाल्याबद्दल त्यांना फटकारले. घरी परतताना त्यांनी आपली नाराजी आणि वेदना शब्दांत मांडल्या.honor in china यामुळेच त्यांची ‘मॅन इन अ हरी’ ही कविता जन्माला आली. ही कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली. इथूनच त्यांच्या साहित्यिक प्रवासाची सुरुवात झाली. त्यानंतर 2023 मध्ये त्यांचा पहिला कविता संग्रह ‘मॅन इन अ हरी: पोएम्स ऑफ अ फूड डिलिव्हरी रायडर’ प्रकाशित झाला.