मोठी बातमी...वर्धेत समृद्धीवर भीषण अपघात ; ६ जण ठार

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |

Horrific accident on Samruddhi Expressway in Wardha
 
 
पुलगाव, 
Horrific accident on Samruddhi Expressway in Wardha समृद्धी महामार्गवरील अपघाताची मालिका थांबता थांबेना. मध्यरात्री कारला मागून आयशरने धडक दिली. यात सहा लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वीरूळ इंटरचेंज जवळही घटना घडली. कारमधील चालकासह चौघाचा मृत्यू तर आयशर ट्रॅकमधील ड्रायवर आणि क्लीनरचाही मृत्यू झाला. महामार्ग आणि पूलगाव पोलिसानी घटनास्थळी पोहोचत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केली. मृतकांना पुलगावं येथील रुग्णालयात आणण्यात आले.कारवर धडकलेल्या आयषर ट्रकमध्ये मिरच्या होत्या. अपघात होताच ट्रकने पेट घेतल्याचे सांगण्यात येते.मुंबईहून वर्ध्याकडे येत असलेल्या कारचा विरूळ टोलनाक्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात वर्धा जिल्ह्यातील सालोड (हिरापूर) येथील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये वाहन चालक अंकुश लक्ष्मण राऊत ( ३०) राजू टिपले, त्यांची पत्नी आणि मुलगी यांचा अपघातात मृत्यू झाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे.