नागपूर,
jana-gana-mana-convent-school जाह्नवीज मल्टी फाउंडेशन, डोंबिवली (मुंबई) यांच्या वतीने दावसा (ता. नरखेड) येथील जेएमएफ च्या जन गण मन कॉन्व्हेंट स्कूल मध्ये दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थी सत्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व करिअर मार्गदर्शन सेमिनार उत्साहात पार पडलासंस्थापक अध्यक्ष तथा टेड-एक्स वक्ता डॉ. राजकुमार एम. कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, करिअर नियोजन, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्त्व विकास याविषयी मार्गदर्शन केले. तसेच शिस्त, कठोर परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोनातून यश मिळविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात एसएससी आणि एचएससी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला,jana-gana-mana-convent-school शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अनेक शिक्षकांना 'आदर्श शिक्षक पुरस्कार' प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला २५० हून अधिक विद्यार्थी, १०० पेक्षा अधिक पालक, विविध शाळांचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमास फाउंडेशनच्या सचिव डॉ. प्रेरणा आर. कोल्हे यांच्यासह पदाधिकारी व शिक्षकांची उपस्थिती होती.
सौजन्य: सुनील तांदुळकर ,संपर्क मित्र