हरिश्चंद्रगडावर दरड कोसळली; चार पर्यटक गंभीर जखमी

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
अहमदनगर,
Landslide at Harishchandragad अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसरातील हरिश्चंद्रगडावर ट्रेकसाठी गेलेल्या पर्यटकांवर दरड कोसळून चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या या गडावर झालेल्या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालाड येथील दहा जणांचा गट हरिश्चंद्रगडावर ट्रेकसाठी आला होता. गडावरून परतीच्या प्रवासाला सुरुवात केल्यानंतर आडव्या कड्याच्या मागील भागातून ते खाली उतरत असताना अचानक माती आणि दगडांचा मोठा भाग त्यांच्या दिशेने कोसळला. या दुर्घटनेत चार पर्यटक गंभीर जखमी झाले.
 
 

asfert 
 
घटनेनंतर इतर सहकाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमींना सुरक्षितस्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले असून त्यांच्या उपचारासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.सतत सुरू असलेल्या पावसामुळे डोंगरकड्यांवरील माती सैल झाल्याने दरड कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर पावसाळ्यात डोंगराळ भागात ट्रेकिंग करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.