सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ मानोर्‍यात भव्य आक्रोश रॅली manora protest

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
मानोरा
manora protest दिल्ली येथील जंतर-मंतर येथे उपोषणाला बसलेले लडाखचे ख्यातनाम शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या देशहिताच्या प्रमुख मागण्यांसाठी २० जुलै रोजी विद्यार्थी एकता संघ मानोरा यांच्यावतीने शहरात भव्य आक्रोश रॅली काढण्यात आली.
 

manora protest rally held in support of sonam wangchuk, memorandum submitted to president 
सकाळी ११.३० वाजता पंचायत समिती कार्यालयापासून सुरू झालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चात मानोरा तालुयातील विविध समाजसेवा संघटना, राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार, विद्यार्थी, पालक वर्ग आणि नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्च्याच्या सांगतेनंतर तहसीलदार यांच्यामार्फत भारताच्या महामहीम राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकार धोरणांचा तीव्र निषेध केला. नीट सारख्या उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रवेशासाठीच्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेत झालेल्या पेपरफुटी प्रकरणाची नैतिक, प्रशासकीय व राजनैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा, सोनम वांगचूक यांच्या प्रदीर्घ आंदोलनाची दखल घेऊन लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा, लडाखचा समावेश घटनेच्या सहाव्या परिशिष्टात करावा. केंद्र सरकारने या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांची त्वरित दखल न घेतल्यास १५ ऑगस्टपासून देशभर तीव्र आंदोलन व उपोषण छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरविंद इंगोले, अ‍ॅड. ज्ञायक पाटणी, उबाठा शिवसेनेचे तालुका प्रमुख रविंद्र पवार, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष रामनाथ राठोड, बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे, वंचितचे तालुकाध्यक्ष विनोद राठोड, शरद हांडे, विजय चव्हाण, विजय पाटील, भावसिंग राठोड, ठाकुरसिंग चव्हाण, प्रकाश राठोड, बाळासाहेब डेरे, सुनील राठोड, गोपाल चव्हाण, शाम पवार, श्याम राठोड, विशाल राठोड, गजानन सोनटक्के, प्रफुल्ल इंगोले, सुशांत खडसे, अक्षय अंधारे, रविंद्र पवार, बाळासाहेब डेरे, अभिजित राठोड, आवेश सिरमितिया, किसन वायले, चेतन पवार, बाळू राठोड, आनंदा खुळे, नितीन चगदळ, गणेश जामदार, महेश राठोड, हाफीज खान ,यांचेसह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.संचालन गोपाल चव्हाण यांनी केले तर आभार माणिक डेरे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.