मेघदूत अंत्याक्षरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Nataraj Art and Culture Center संस्कृत सखी सभा व नटराज आर्ट अँड कल्चर सेंटर, धरमपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 'मेघदूत अंत्याक्षरी' स्पर्धा उत्साहात पार पडली. डॉ. सौ. विजया विलास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेत 'अवंतिका', 'अलका' आणि 'अमरावती' या तीन गणांतील २३ सख्यांनी सहभाग घेतला.

sara 
 
 
डॉ. वीणा गानु व डॉ. सौ. कविता होले यांनी परीक्षण केले. मेघदूत, अभिज्ञान शाकुंतल, कुमारसंभव आणि नीतिशतक या ग्रंथांवर आधारित पाच फेऱ्यांमध्ये स्पर्धा झाली. 'अवंतिका' गण विजेता, तर 'अलका' गण उपविजेता ठरला.वैशाली खंडाळकर व वैशाली रेवतकर यांना उत्कृष्ट सादरीकरणासाठी वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सौजन्य:रवींद्र हरदास,संपर्क मित्र