अनुसुचित जाती उपवर्गीकरण विरोधात जिल्हास्तरीय महामोर्चाचे आयोजन

*आरक्षण संपविण्याचे व गैर संविधानिक क्रिमीलेयर लावण्याचे षडयंत्र

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
बुलढाणा, 
mega-rally : अनुसुचित जातीचे उपवर्गीकरण करून जाती जातीमध्ये फुट पाडून आरक्षण संपविण्याचे व गैरसंविधानिक क्रीमीलेयर लावण्याचे षडयंत्र सुरु असून समाजाची दिशाभूल करून तेढ निर्माण करण्याचे तसेच ज्यामुळे आरक्षणचा आधिकारी कमकुवत होऊन आरक्षण संपूष्टात आणण्यासाठी शासनाने अनुसुचित जातीच्या उपवर्गीरणाची प्रक्रिया सुरु केली आहे. त्याविरोधात बुलढाणा जिल्हास्तरीय महामोर्चाचे आयोजन २९ जुलै रोजी करण्यात आले आहे. अशी माहिती अनुसुचित जाती उपवर्गीकरण विरोधी संषर्घ समितीने पत्रकार परिषदेत दिली आहे.
 
 
hn
 
 
 
येथील पत्रकार भवन येथे दि. २० जुलै रोजी दुपारी समितीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला जिपचे माजी सभापती दिलीप जाधव, सम्राट संघटनेचे आशिष खरात, समितीचे कुणाल पैठणकर, प्रतिक जाधव, अमोल खरे, विनोद इंगळे, विजय राऊत, निलेश गायकवाड, दिलीप राजमोल, राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे डी. आर. माळी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
पत्रकार परिषदेत बोलतांना दिलीप जाधव, कुणाल पैठणकर, आशिष खरात, डी. आर. माळी, अमोल खरे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक संघर्षातून भारतीय संविधानाने देशातील समस्त अनुसुचित जातीला आरक्षण दिले आहे. परंतू शासनाने अनुसुचित जातीच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरु केली आहे. ते तात्काळ रद्द करावी तसेच नियुक्त माजी न्यायमूर्ती अनंत बदर आयोगाचा अहवाला तात्काल सार्वजनिक करून गैर संविधानीक समिती रद्द करण्यात यावी अनुसुचित जातीच्या उपवर्गीकरणाला राज्यातील ५९ जातीपैकी ५८ जातीचा विरोध आहे.
 
 
त्यामुळे वर्गीकरण तात्काळ रद्द करावे समाजाची जातीनिहाय सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीचा व्यापक सर्वेक्षण करून त्याचा अहवाल जाहीर करण्यात यावा तसेच शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेमधील अनुषेश भरती पदे भरण्यात यावी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, वसतीगृहे, कौशल्य विकास योजना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, उच्च शिक्षणाच्या सुविधा वाढवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपाययोजना कराव्यात या प्रमुख मागणीसाठी बुधवार दि. २९ जुलै रोजी जिजामाता प्रेक्षागार येथे सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात आनंदराज आंबेडकर, माजी बबनराव घोलप, खा. चंद्रकात खांडोरे, आ. सिद्धार्थ खरात, आ. राजकुमार बडोले, जोगेंद्रनाथ कवाडे उपस्थित राहणार आहेत. सर्व पक्ष संघटना या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.