मुंबई
badlapur case बदलापूर येथील एका प्रकरणात अटकेत असलेला अक्षय कुरतडकर सध्या आधारवाडी कारागृहात बंद असून, त्याला कारागृहातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या मारहाणीत अक्षय गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या पायाला तब्बल १६ टाके पडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुरतडकर कारागृहात असताना आंघोळ करून परत बैरकच्या दिशेने जात होता. त्यावेळी दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला अडवून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे. अक्षयच्या मावशी यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्या संबंधित विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.
दरम्यान, पुण्यातील एका अन्य प्रकरणात तीन पानी सुसाईड नोट आणि व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप आक्रमक झाला असून, “तोंड लपवून...” अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे.डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विष्णुनगर पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली आहे. या प्रकरणात रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला होता.न्यायालयाने रमेश म्हात्रे यांनी आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलिसांसमोर शरण यावे, असे स्पष्ट निर्देश दिले होते. तसेच आदेशाचे पालन न केल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही न्यायालयाने दिला होता.या पार्श्वभूमीवर रमेश म्हात्रे आज विष्णुनगर पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी त्यांना कल्याण न्यायालयात हजर केले. कल्याण न्यायालयाने त्यांना ३ ऑगस्टपर्यंत १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.महाराष्ट्रातील घडामोडींमध्ये पंढरपूर कॉरिडॉरच्या मुद्द्यावरही चर्चा सुरू असून, “शेतकऱ्यांना विश्वासात घेणार; जबरदस्ती नाही,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.