संघटन, सेवा आणि शिस्त हीच राष्ट्रनिर्माणाची गुरुकिल्ली : प्रा. मुंदडा

रा. स्व. संघ पुलगाव नगर खंड आयोजित युवा संमेलन उत्साहात

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
पुलगाव
rss आजचा युवक हाच राष्ट्राचा आधारस्तंभ आहे. संघटन, सेवा आणि शिस्त ही तीन मूल्ये अंगीकारून समाजाच्या प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे. स्वार्थ बाजूला ठेवून ‘राष्ट्रप्रथम’ ही भावना ठेवूनच आपण समाजासाठी काम केले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य तथा भारतीय विचार मंचचे जिल्हा संयोजक प्रा. धर्मेंद्र मुंदडा यांनी केले.
 

rss  
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुलगाव नगर खंडच्या वतीने स्थानिक मातृ सेवा सभागृहात आयोजित युवा संमेलनात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी खंड कार्यवाह मानसिंग झाँझोटे आणि तालुका संघचालक अरविंद हलमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.या संमेलनास २२३ युवक उपस्थित होते. शाखेमध्ये विविध शारीरिक उपक्रम, खेळ तसेच संघटनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. युवकांनी सर्व उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला.
 
यावेळी प्रा. धर्मेंद्र मुंदडा यांनी युवकांना राष्ट्रनिर्माण, चारित्र्य संवर्धन, सामाजिक उत्तरदायित्व आणि भारतीय संस्कृतीचे जतन याविषयी सुद्धा मार्गदर्शन केले.संचालन अक्षय पाठक यांनी केले. संकेत बाभळे यांनी वैयक्तिक गीत आणि प्रथमेश डोलारे यांनी सांघिक गीत सादर केले. युवकांनी सामूहिक हनुमान चालीसाचे पठण करून राष्ट्रसेवा व समाजकार्याचा संकल्प व्यक्त केला.