ढाका
adani बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाच्या वार्षिक अहवालानुसार, अदानी वीज प्रकल्पातून मिळणाऱ्या विजेची किंमत प्रति युनिट अंदाजे १४.८६ टका आहे. तर एनव्हीव्हीएन, पीटीसी इंडिया आणि सेम्बकॉर्प या तीन भारतीय पुरवठादारांची सरासरी किंमत प्रति युनिट केवळ ९.३३ टका आहे. अदानीची वीज इतर पुरवठादारांपेक्षा ५९ टक्क्यांपर्यंत अधिक महाग आहे, असा आरोपही अहवालात करण्यात आला आहे़.

adani बांगलादेशी वृत्तपत्रानुसार, बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाच्या वार्षिक अहवालाच्या विश्लेषणात असे म्हटले आहे की, अदानीकडून खरेदी केलेल्या विजेची किंमत भारतातील इतर तीन वीज पुरवठा कंपन्यांच्या एकत्रित सरासरी दरापेक्षा अंदाजे ५९ टक्के जास्त होती. बांगलादेश अदानी पॉवर, एनटीपीसी विद्युत व्यापार निगम लिमिटेड, सेम्बकॉर्प एनर्जी इंडिया लिमिटेड आणि पॉवर ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या चार भारतीय पुरवठादारांकडून स्वतंत्र करारांनुसार वीज खरेदी करतो़ अहवालानुसार, पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाने २०२५ मध्ये अदानीकडून खरेदी केलेल्या विजेसाठी प्रति युनिट सरासरी १४.८६ टका दिले. या तुलनेत, इतर तीन पुरवठादारांचा एकत्रित सरासरी दर ९.३३ टका होता. त्यामुळे अदानीचा दर एनव्हीव्हीएनच्या प्रति युनिट ७.५८ टाका सरासरी दरापेक्षा अंदाजे ९६ टक्के जास्त, पीटीसी इंडियाच्या प्रति युनिट १०.२० टका दरापेक्षा अंदाजे ४६ टक्के जास्त आणि सेम्बकॉर्पच्या प्रति युनिट १०.२२ टाका दरापेक्षा ४५ टक्के जास्त होता.
तीन वेगवेगळ्या सीमापार कॉरिडॉरद्वारे वीज आयात
adani बिझनेस स्टँडर्डने लिहिले आहे की, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये बांगलादेशने अदानीच्या झारखंड येथील प्रकल्पातून ८,०३० दशलक्ष किलोवॅट/तास वीज आयात केली. त्यासाठी प्रति युनिट सरासरी १४.८६ टका दराने ११,९३३.४४ कोटी टका दिले. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये, बांगलादेशने ८,१७० दशलक्ष किलोवॅट/तास वीज आयात केली आणि प्रति युनिट सरासरी १४.८७ टका दराने १२,१४६.९६ कोटी टका दिले. बांगलादेश तीन वेगवेगळ्या सीमापार कॉरिडॉरद्वारे एनव्हीव्हीएनकडून वीज आयात करतो.