पीडितेला मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रस्ताव : जिल्हाधिकारी

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
rotha-rape-murder-case : रोठा येथील चिमुकली अत्याचार व हत्या प्रकरणासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर पाठपुरवठा सुरू आहे. पीडितेच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी प्रस्ताव करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी दिली.
 
 
wardha
 
 
 
रोठा येथे नराधमाने केलेले कृत्य घृ्रणास्पद आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने संवेदनशिलपणे प्रकरण हाताळले. पोलिस विभागाने घटना घडल्यादिवशीच गुन्हा नोंद करुन विशेष तपास पथकाची नियुती करुन आरोपीला अटक केली आहे.
 
 
संबंधीत प्रकरणात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वान्मथी सी. यांनी घटना घडल्यापासुन विविध विभागात समन्वय साधुन यथाशिघ्र कार्यवाही होईल, याअनुषंगाने विविध विभागाच्या क्षेत्र भेटी, कुटुंबियास योजना, अनुदान लाभ त्वरित मिळण्यासाठी कामकाज पार पाडून स्थानिक विभाग व आंतरजिल्हा समन्वय राखला आहे. जिल्हादंडाधिकार्‍यांनी महिला व बाल विकास विभाग, पोलिस विभाग, एकात्मीक आदिवासी प्रकल्प विभाग, जिल्हा शल्य चिकीत्सक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, तहसिलदार यांच्यात परस्पर समन्वय राखुन वरिष्ठ पातळीवर अहवाल सादर केले. पिडीत कुटूंबियास मुख्यमंत्री सहायता निधी मधुन आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी ही प्रस्ताव सादर केलेला आहे. आज २० रोजी सर्व विभागांच्या बैठकीत आजपर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेतला. विभागांनी समन्वय राखुन पीडित बालिकेच्या कुटूंबियास न्याय व आर्थिक लाभ मिळावा, यासाठी समन्वय राखण्याच्या सुचना दिल्या. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी संजय तेली व जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.