138 दिवस शनिची परीक्षा; या तीन राशींनी राहा सावध

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
Saturn's 138-Day Test वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव 27 जुलै 2026 रोजी वक्री होणार असून ही वक्री अवस्था 11 डिसेंबर 2026 पर्यंत म्हणजेच एकूण 138 दिवस कायम राहणार आहे. ज्योतिषशास्त्रात शनिला कर्म आणि न्यायाचा ग्रह मानले जाते. त्यामुळे त्याच्या राशीपरिवर्तनाप्रमाणेच वक्री गतीलाही विशेष महत्त्व दिले जाते. सध्या साडेसातीचा प्रभाव असलेल्या मेष, कुंभ आणि मीन राशींवर या काळात वेगवेगळे परिणाम दिसून येऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह आपल्या नेहमीच्या गतीच्या विरुद्ध दिशेने फिरताना दिसतो, त्या अवस्थेला वक्री गती म्हटले जाते. अनेकांच्या मते वक्री ग्रह नेहमीच नकारात्मक परिणाम देतात, मात्र ज्योतिषशास्त्रात तसे मानले जात नाही. काही बाबतीत वक्री शनि अडचणी निर्माण करतो, तर काही क्षेत्रांत सकारात्मक बदलही घडवून आणतो.
 

atun 
 
 
मेष राशीच्या व्यक्ती सध्या साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात आहेत. या काळात कामकाजाचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये विलंब होऊ शकतो आणि व्यवसायातही अपेक्षित गती मिळणे कठीण जाऊ शकते. आर्थिक लाभ मिळण्यात काही अडथळे निर्माण होण्याची शक्यता असली, तरी अनावश्यक खर्च आणि धावपळ कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
कुंभ राशीच्या व्यक्ती सध्या साडेसातीच्या अंतिम टप्प्यात आहेत. शनिच्या वक्री गतीमुळे त्यांना संमिश्र परिणाम मिळू शकतात. कुटुंबातील मतभेद कमी होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते आणि आर्थिक नुकसान टाळता येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आरोग्याच्या काही तक्रारींमध्येही दिलासा मिळू शकतो. मात्र, परदेशाशी संबंधित कामांमध्ये काही अडथळे येऊ शकतात.
मीन राशीच्या व्यक्ती सध्या साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात आहेत. या काळात मानसिक तणाव आणि नकारात्मकता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत सकारात्मक बदल जाणवू शकतात. उत्पन्नाचे मार्ग मोकळे होण्याची शक्यता असून परदेशाशी संबंधित कामांमध्ये अनुकूल परिणाम मिळू शकतात. मात्र, आळस टाळणे आणि आर्थिक नियोजनाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते.