अमोल सांगानी,
राळेगाव,
sowing-ralegaon : राळेगाव तालुक्यात यंदाचा खरीप हंगाम अनिश्चिततेच्या भोवèयात अडकला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकèयांनी मोठ्या आशेने कापूस, सोयाबीन, तूर आणि इतर खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली. मात्र त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने संपूर्ण तालुक्यातील शेती चिंतेच्या छायेत आली आहे. अनेक शेतांमध्ये उगवलेली पिके पाण्याअभावी सुकू लागली असून, ज्या ठिकाणी बियाणे उगवले नाही तेथे दुबार, तर काही भागात तिबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकरी रोज सकाळी शेतात जातो, माती हातात घेतो आणि नंतर नजर आभाळाकडे वळते. कारण त्याच्या शेतातील प्रत्येक रोप आता पावसाच्या एका सरीवर अवलंबून आहे. पाऊस न पडल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी रोपे पिवळी पडू लागली आहेत. आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.
हवामानातील सातत्याने होणारे बदल शेतीसाठी मोठे आव्हान ठरत आहेत. कधी अतिवृष्टी तर कधी दीर्घकाळ पावसाचा खंड, अशा टोकाच्या परिस्थितीमुळे शेतीचे संपूर्ण गणित बिघडले आहे. नियोजन करूनही निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकèयांचे कष्ट वाया जात आहेत. शेतीवर आधारित ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही याचा विपरित परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
राळेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून शेतीची कामे जवळपास ठप्प झाली आहेत. खतांचा वापर, तणनाशकांची फवारणी, आंतरमशागत अशी महत्त्वाची कामे रखडली आहेत. योग्य वेळी पाऊस न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा परिणाम थेट शेतकèयांच्या उत्पन्न आणि त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर होणार आहे.
आभाळाकडे पाहणाèया डोळ्यांची दखल घ्या
राळेगाव तालुक्यातील शेतकरी आज केवळ पावसाची वाट पाहत नाही, तर आपल्या कुटुंबाच्या उद्याची वाट पाहत आहे. त्याच्या शेतात उभे असलेले प्रत्येक रोप म्हणजे त्याच्या कष्टांचे, कर्जाचे आणि भविष्याचे प्रतीक आहे. शेती हा केवळ व्यवसाय नाही; ती ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेतकèयांच्या समस्या केवळ आकडेवारीत न मोजता, संवेदनशीलतेने हाताळण्याची वेळ आली आहे.