
mamata banerjee राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने तृणमूल काँग्रेसची एकूण ₹४४०.४२ कोटींची तीन बँक खाती गोठवली आहेत. पक्षाच्या काही बँक खात्यांमार्फत होणारे कथित अप्रामाणिक आर्थिक व्यवहार, बेकायदेशीर निधी उभारणी आणि निधीच्या संशयास्पद हस्तांतरणाच्या तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात दोन्ही पक्षांनी आपला युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर न्यायमूर्ती कृष्णा राव यांनी १३ जुलैला याचिकेवरील अंतरिम आदेश राखून ठेवला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ईडीच्या प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, एप्रिल २०२३ ते जून २०२६ दरम्यान तृणमूलच्या बँक खात्यांमधून केअरवेल एव्हिएशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि तिच्या संबंधित कंपनीकडे अंदाजे १६० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले होते.
११२ कोटी रुपयांचा वापर