वर्धा,
shankar-prasad-agnihotri : संत सखुबाई या अढळ भक्ती, सहनशीलता आणि समर्पणाचे प्रतीक होत्या, असे प्रवचन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी संत सखुबाई यांच्या महात्म्यावर केले. मंगळवार १४ रोजी श्रीक्षेत्र महाकाली धामतीर्थ येथे ज्येष्ठ अमावस्या व पंधरवाडी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पं. अग्निहोत्री म्हणाले, पंढरपूरजवळ एका गरीब, अत्यंत धार्मिक कुटुंबात सखूबाईंचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना विठ्ठलभक्ती व वारी करण्याची ओढ होती. दरम्यान, त्रिदेवींचे अष्टांग पूजन करून होम हवन करण्यात आले. यावेळी बाबुलाल दिग्रसे, चंद्रभान आसोले, बाबाराव महाजन, अनिल बोडखे, संजय नांदुरकर, गजानन पोकळे, गणेश काळे यांच्यासह अनेक माई भक्त उपस्थित होते.