एकपात्री स्वगतांतून अवतरली ‘मर्म बंधातली ठेव’

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
नागपूर,
literary-collection-initiative : विदर्भ साहित्य संघाच्या ‘साहित्य कट्टा’ या उपक्रमांतर्गत शनिवारी शंकरनगरातील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात ‘मर्म बंधातली ठेव...’ हा एकपात्री नाट्यप्रयोगांचा विशेष कार्यक्रम पार पडला. विविध गाजलेल्या मराठी नाटकांतील प्रभावी स्वगतांचे सादरीकरण करून नाट्यकलावंतांनी रंगभूमीच्या सुवर्णकाळाची अविस्मरणीय सफर घडवली.
 
 
 
ngp
 
 
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रभाकर आंबोणे, तर बापू चनाखेकर प्रमुख पाहुणे होते. विदर्भ साहित्य संघाच्या उपाध्यक्ष माधुरी साकुळकर, बाळ कुळकर्णी आणि शुभदा फडणवीस यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
 
देवेंद्र दोडके यांनी ‘एकच प्याला’ मधील सादर केलेल्या ‘सुधाकर’ ला प्रेक्षकांनी भरभरून टाळ्यांनी प्रतिसाद दिला, प्रभाकर अंबोणे यांनी ‘महंत’मधील ‘राजा’, मीना देशपांडे यांनी ‘सर्कस वाला’ मधील ‘आजीबाई’, मुकुंद वसुले यांनी ‘एकच प्याला’ मधील ‘तळीराम’, श्रद्धा तेलंग यांनी ‘लेखिका’ मधील ‘जाई’, नीलकांत कुलसंगे यांनी ‘राजरक्त’ मधील ‘प्रथम’, संयुक्ता थोरात यांनी ‘फुलराणी’, मोहन पांडे यांनी ‘वाजे पाऊल अपुले’ मधील ‘व्यंकट वकील’, देवेंद्र लुटे यांनी त्यांच्याच ‘शुभमंगल सावधान’ मधील ‘गुरुमाऊली’, अशोक आग्रे यांनी ‘नटसम्राट’ मधील ‘आप्पासाहेब बेलवलकर’, विनोद तुंबडे यांनी ‘मत्सगंध’मधील ‘पितामा भीष्म’, वैदेही चवरे यांनी ‘शुद्ध वेदनेची गाणी’ मधील ‘अवंतिका’, दीपलक्ष्मी भट यांनी ‘कर्मयोगिनी अहिल्याबाई’, प्रणाली राऊत यांनी ‘धर्मपुत्र’ मधील ‘बाई’, गीता काळे व विनोद काळे यांनी ‘संतान’ मधील ‘केशवराव आणि जानकी’ या भूमिका साकारत एकाहून एक सरस एकपात्री प्रयोग सादर केले. अमर मसराम यांनी शेवटी ‘भैरवी’ सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रमाचे संयोजन आसावरी तिडके-गडेकर यांनी केले.