वाशीम,
vidya bharati विद्याभारती वाशीम जिल्ह्याच्या वतीने २० जुलै रोजी शाळा संपर्क अभियानाचा शुभारंभ सकाळी ९ वाजता वाशीम येथील विद्यासागर गुरुकुल शाळेतून करण्यात आला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यासागर गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष विनोद गडेकर हे होते तर उद्घाटक म्हणून रा.स्व.संघाचे नगर संघचालक दिपक जहागीरदार होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्या भारती विदर्भ प्रांत सहमंत्री विद्यावाचस्पती प्रा.दिलीपजी जोशी होते. प्रमुख उपस्थितीत विद्याभारती विदर्भ प्रांत उपाध्यक्ष सत्त्यानंद कांबळे, जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल धुमकेकर आणि जिल्हा मंत्री प्रा. श्रीकांत जोशी, प्राचार्या ममता गुप्ता हे होते.
प्रमुख वक्ते प्रा. दिलीप जोशी यांनी शाळा संपर्क अभियानाबद्दल बोलतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष असून, विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थानला स्थापन होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले आहेत.तसेच विद्या भारती विदर्भ चे ही हे पंचविसावे स्थापना वर्ष आहे. शिक्षणातून चारित्र्यसंपन्न मनुष्य निर्माणाचे कार्य व्हावे हे विद्या भारतीचे ध्येय आहे. सद्य स्थितीत शिक्षण भारतात असून, शिक्षणात भारत असणे जरुरीचे आहे. त्यासाठी विद्या भारतीच्या संस्कृती ज्ञान परिक्षेतून भारतीय संस्कृतीचा परिचय होऊन विद्यार्थ्यांमध्ये भारतीयतेचा सहज संस्कार होतो.म्हणून प्रत्येक शाळेने विद्या भारती तर्फे घेतल्या जाणार्या संस्कृती ज्ञान परीक्षेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रा.अनिल धूमकेकर,vidya bharati जिल्हामंत्री प्राचार्य श्रीकांत जोशी, दिपक जहागीरदार यांनी विद्या भारतीच्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद गडेकर यांनी विद्यासागर गुरुकुलातून भारतीय शिक्षण देत असून, विद्या भारतीच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आश्वासनही त्यांनी आपल्या भाषणातून दिले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने तर सांगता नमोकर मंत्र आणि प्रार्थनेने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन संस्कृती गडेकर यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.