रेशन दुकानदाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक

दुकानदार बदलण्याची तहसीलदारांकडे मागणी

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
महागाव, 
ration-shopkeeper : महागाव तालुक्यातील मलकापूर येथील रेशन कार्डधारक नागरिकांनी गावातील सध्याच्या स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत तहसीलदार तथा शिधापत्रिका पुरवठा अधिकाèयांकडे निवेदन सादर केले आहे. सध्याचा दुकानदार बदलून नवीन रास्त धान्य दुकानदाराकडे सर्व रेशन कार्ड जोडून देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात ग्रामस्थांनी नमूद केले आहे की, सध्याच्या दुकानदाराकडून लाभार्थ्यांना नियमितपणे धान्याचे वाटप केले जात नाही. अनेकदा दुकान बंद असते किंवा धान्य उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. शासनाने निश्चित केलेल्या वजनापेक्षा कमी धान्य दिले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
 
 
YTL
 
याशिवाय, अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना 35 किलोऐवजी केवळ 32 किलो धान्य दिले जात असल्याचे तसेच वजनकाट्यात फेरफार करून धान्य कमी दिले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. धान्य वितरणाच्या वेळी लाभार्थ्यांशी अयोग्य वर्तन व शिवीगाळ होत असल्याने गावात वारंवार वाद निर्माण होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
 
 
 
या सर्व प्रकारामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ लाभार्थ्यांना नियमितपणे मिळत नसल्याचा दावा करत संबंधित दुकानदाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच नवीन रास्त धान्य दुकानदाराकडे सर्व रेशन कार्ड वर्ग करण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे. या निवेदनावर मलकापूर येथील अनेक रेशन कार्डधारक नागरिकांच्या स्वाक्षèया असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे गावकèयांचे लक्ष लागले आहे.