४४.३७ सेकंदांत शिवनेरी साकारली

वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

    दिनांक :20-Jul-2026
Total Views |
नागपूर ,
World Record Book of India खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती, नागपूर यांच्या वतीने आयोजित 'शिववैभव किल्ले स्पर्धे'त अभिजित जाधव आणि चमू यांनी 'दुर्ग शिवनेरी'ची हुबेहूब प्रतिकृती अवघ्या ४४.३७ सेकंदांत साकारून नवा विक्रम प्रस्थापित केला. या उल्लेखनीय कामगिरीची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाने घेत अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले.या यशाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गडकरी यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक करत भविष्यात स्वतःचाच विक्रम मोडण्याच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या.
 

Abhay4 
 
 
या यशात खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या पदाधिकारी व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची भावना अभय चोरघडे यांनी व्यक्त केली. त्यांच्या या विक्रमामुळे नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सौजन्य:अभय चोरघडे,संपर्क मित्र