विशेष लोकअदालतीत 121 प्रकरणे निकाली

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
lok-adalat : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार 18 जुलै रोजी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत एकूण 121 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली.
 
 
jlk
 
हा उपक्रम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आनंद यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयामध्ये धनादेश अनादर प्रकरणासाठी विशेष लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
या विशेष लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी वकील व बँकेचे अधिकारी यांच्यासोबत पुर्वनियोजित बैठका घेण्यात आल्या. तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायाधीशांसोबत आभासी पध्दतीने संवाद साधून नियोजन करण्यात आले. या विशेष लोकअदालत मध्ये पक्षकारांना स्वच्छेने व सामंजस्याने वाद अंतिमरित्या मिटविता येते याची खात्री पटल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 121 प्रलंबित प्रकरणे विशेष लोकअदालतमध्ये आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. या माध्यमातून निकाली निघालेल्या प्रकरणांचे एकूण तडजोड मुल्य 2 कोटी 29 लाख 19 हजार 233 रुपये इतके होते.
 
 
या विशेष लोकअदालतीच्या आयोजनासाठी जिल्हा व तालुका न्यायालयातील न्यायाधीश, जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक, व्यवस्थापक, अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दीपक दाभाडे यांनी सहकार्य करणाèया सर्वांचे आभार मानले.