अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते होणार प्रदान

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |

 

पुणे
ajit-doval  दहशतवादविरोधी कारवाया, गुप्त मोहिमा आणि देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणात बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

ajit doval 
 
 
 
ajit-doval  लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (लोकमान्य टिळक स्वराज्य संघ) वतीने शनिवार १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर दुपारी १२ वाजता पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
 

ajit-doval  ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन हॉट परस्यूट, बालाकोट सर्जिकल स्ट्राईक तसेच डोकलाममधील राजनैतिक वाटाघाटींसह देशाच्या सुरक्षेशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण घटनांमध्ये डोवाल यांनी निर्णायक भूमिका बजावली आहे. दहशतवादविरोधी कारवाया आणि गुप्त मोहिमांमधील त्यांच्या योगदानाबद्दल तसेच राष्ट्रकार्यासाठी त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे डॉ. टिळक म्हणाले. १९८३ पासून प्रदान करण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे पहिले मानकरी एस. एम. जोशी होते.

ajit-doval  आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंह, प्रणव मुखर्जी, शरद पवार, नितीन गडकरी, नारायण मूर्ती, डॉ. के. सिवन, बाबा कल्याणी, डॉ. सायरस पूनावाला आणि सुधा मूर्ती यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
 

ajit-doval अजित डोवाल यांनी भारतीय पोलिस सेवा आणि गुप्तचर क्षेत्रात ३३ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली आहे. १९६८ मध्ये भारतीय पोलिस सेवेत दाखल झाल्यानंतर १९७२ मध्ये ते गुप्तचर विभागात रुजू झाले. मिझोराम, सिक्कीम, पंजाब आणि जम्मू-काश्मीर येथे त्यांनी महत्त्वाच्या क्षेत्रीय जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांनी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयात ७ वर्षे काम केले. २००५ मध्ये इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख म्हणून निवृत्त झाल्यानंतर ते भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.