बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये ६१ कोटींचा कथित घोटाळा

दोघांवर गुन्हा दाखल

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
कोल्हापूर
scam  महाराष्ट्र, कर्नाटक आणि सीमा भागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापुरातील आदमापूर संत सद्गुरु श्री बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये तब्बल ६१ कोटी ७४ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. देवस्थानच्या जमिनी बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी-विक्री, ट्रस्टच्या निधीचा गैरवापर असा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी ट्रस्टच्या तत्कालीन कार्याध्यक्ष रागिनी खडके, सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यावर भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणाची व्याप्ती पाहता हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली.

scam 
 

काय आहे नेमके प्रकरण?
scam धर्मादाय आयुक्त, मुख्यालय, मुंबई येथील देवस्थान शाखेचे निरीक्षक रंगराव गडकरी यांनी भुदरगड पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, मार्च २०२० ते मार्च २०२६ या कालावधीत आदमापूर येथील संत सद्गुरू श्री बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता, देवस्थानच्या जमिनी खरेदी- विक्री करताना तीस कोटींचा झालेला गैरव्यवहार, बाळूमामाच्या 44 हजार मेंढ्यांची विक्री करताना दाखवलेला दर यामुळे ट्रस्टच्या कारभाराबाबत उच्च न्यायालयात मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या होत्या. न्यायालयाचे नाईक अधिकारी एम. बी. लांबे यांनी याप्रकरणी चौकशी समिती नेमली होती.
scam या समितीच्या अहवालानुसार, धर्मादाय मुख्यालयातील निरीक्षक रंगराव गडकरी यांच्या तक्रारीनुसार, कोल्हापूरच्या भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे,‘ अशी माहिती पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. ‘अजूनही कागदपत्रांची तपासणी सुरू असून, या पुढचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे, देवस्थान समितीकडील मौल्यवान दस्तऐवज ताब्यात घेतले असून, कागदपत्रांची छाननी सुरू आहे तपासांती सर्व चित्र स्पष्ट होईल. जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई होईल,‘ अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपाधीक्षक सुवर्णा पत्की यांनी दिली.