अरिजित सिंह परततोय!

    दिनांक :21-Jul-2026
Total Views |
मुंबई,
Arijit Singh is coming back लोकप्रिय गायक अरिजित सिंह यांच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. काही काळानंतर अरिजित सिंह पुन्हा प्लेबॅक सिंगिंगमध्ये परतणार असल्याची माहिती आहे. अभिनेता इमरान हाशमी यांच्या आगामी ‘आवारापन २’ या चित्रपटातील ‘ये आवारापन’ या गाण्याद्वारे त्यांचे पुनरागमन होणार असल्याचे सांगितले जात आहे.या गाण्याला अमाल मलिक यांनी संगीत दिले असून, रश्मी विराग यांनी गीतलेखन केले आहे. अरिजित सिंह पुन्हा आपल्या आवाजाची जादू दाखवणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
 
 

rjeet 
 
‘ये आवारापन’ हे गाणे मंगळवार, २१ जुलै रोजी यूट्यूब तसेच इतर संगीत प्रवाह मंचांवर प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त आहे. अरिजित सिंह आणि विशेष फिल्म्स यांच्यातील संबंध जुना आहे. याच बॅनरने ‘मर्डर २’ चित्रपटातील ‘फिर मोहब्बत’ या गाण्याच्या माध्यमातून अरिजित सिंह यांना मोठी संधी दिली होती. त्यानंतर ते हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय गायकांपैकी एक बनले.‘आवारापन २’ हा २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या इमरान हाशमी यांच्या गाजलेल्या ‘आवारापन’ चित्रपटाचा पुढील भाग आहे. नितीन कक्कड यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटात इमरान हाशमी पुन्हा एकदा शिवम पंडित या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात दिशा पाटनी, शबाना आजमी, सुरेंद्र विक्की, विजयंत कोहली आणि अतुल कुमार हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. ‘आवारापन २’ हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर सनी देओल अभिनीत ‘बंटवारा १९४७’ या चित्रपटाशी टक्कर होणार आहे.